जिवघेण्या आगीतून 90,000 जनावारांना वाचवले या कुटुंबाने
बुधवार, 8 जानेवारी 2020 (11:03 IST)
स्टिव्ह इरवीन वन्यजीव संरक्षणकर्त्यांच्या कुटुंबाने कौतुकास्पद कार्य केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीतून तब्बल 90 हजार जनावांराचा जीव वाचवला आहे. स्टिव्हने आपल्या कुटुंबासह 90 हजार प्राणी आणि पक्ष्यांवर उपचार केले आहेत. या कामगिरीमुळे त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
ऑस्ट्रेलिया भीषण आगीच्या वणव्यामुळे होरपळला असून न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या या भीषण आगीत जवळपास 48 कोटी प्राणी आणि पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला.
स्टिव्हचे कुटुंब क्विसलँडमध्ये एक रूग्णालय चालवत आहेत. येथे त्यांनी आगीमध्ये होरपळलेल्या 90 हजार जंगली जनावरांचा जीव वाचवला आहे. स्टिव्ह यांची मुलगी बिंडीने ही सर्व माहिती दिली आहे. बिंडी ऑस्ट्रेलियाच्या जू मध्ये आपलं वाइल्डलाइफ हॉस्पिटल चालवते.
तिने जंगली जनावरांचे आगीतून बाहेर आल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत. या आगीत कोआला बॅट्स, अस्वल आणि कांगारू हे जनावर मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत.
हे वणवे काबूत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सर्व थरांतील सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संघटना, अग्निशमन आणि वनवणवे तज्ज्ञ कामाला लागले आहेत.