ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपल्या ट्विटर हॅँडलवरुन एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 'Kithana ache he Modi' (कितना अच्छा है मोदी!) आणि यासोबतच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत घेतलेला सेल्फी फोटो अपलोड केला आहे.
जी 20 परिषदेत गंभीर मुद्द्यावर नेत्यांची चर्चा सुरु आहे. या दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल मोदींचं अभिनंदन केलं. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोदींचं कौतुक करत म्हटलं की निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्ही या विजयास पात्र आहात. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा निवडणूक जिंकलात, तेव्हा अनेक गट आपापसात लढत होते. मात्र आता ते एकत्र आले आहेत. यातून तुमची अद्भुत क्षमता दिसते,' अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी मोदींचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी केलेल्या कौतुकाबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले.
तेव्हा मोंदींनी आपला नारा सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र असून मेक इन इंडियाच्या माध्यमातून आम्ही पुढे जात असल्याचं ट्रम्प यांना सांगितलं. तर गेल्या काही वर्षांत भारत- अमेरिकेचे संबंध सुधारले असून ही मैत्री नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे महणत ट्रम्प यांनी मोदींना चांगले मित्र असल्याचे देखील म्हटले.