ब्रिटनच्या प्रिंसचा समोसा चोरी करण्याचा व्हिडिओ व्हायरल
भूक माणसाकडून काय नाही करवतं मग ती व्यक्ती साधारण असो वा राजकुमार. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे हल्ली व्हायरल होत असलेला व्हिडिओ ज्यात ब्रिटनचे राजकुमार प्रिंस हेरी हातात समोसा लपवून जात असताना दिसत आहे.
ITV News ने आपल्या ट्विटर हँडलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. भुकेले प्रिंस हेरी कुकबुक लाँचिंग कार्यक्रम दरम्यान स्नेक घेऊन जाताना दिसून आले.’ ट्विटरवर प्रिंस हेरी यांचा हा मासूम कृत्य लोकांना खूप पसंत येत आहे. आणि त्यांच्या शरारती हसण्याचे कौतुक केले जात आहे.
प्रिंस हेरी पत्नी मेगन मार्केलसह एका कुकबुकच्या लाँचिंगमध्ये पोहचले होते. या समारंभात त्यांना टेबलवरून एक समोसा चोरत असताना बघितले गेले. समोसा हातात मागे लपवत गेस्टसोबत बोलत असताना व्हिडिओत दिसून येत आहे.
Caught red-handed!
Hungry Prince Harry seems to be taking a snack home after attending the 'Together' cookbook launch with Meghan and her mother pic.twitter.com/Uta8EPB5R8