हल्ली सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात आणि लोक त्यावर मजेदार कमेंट्स ही करत असतात. काही व्हिडिओ मजेदार असतात तर काही धक्कादायक. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिला एका पुरुषाला उचलून आपटताना दिसत आहे.
महिला पुरुषाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे व्हिडिओत महिला ज्या पुरुषाला मारहाण करत असताना दिसत आहे तो तिचा नवरा असल्याचे सांगण्यात येत आहे.
या व्हिडिओत एक महिला स्टेशनवर उभी असल्याचे दिसून येत आहे. पुरुष काही सांगत असताना त्यांच्यात वाद होताना दिसतो आणि महिला अचानक त्याला मारते आणि नंतर त्याला उचलून प्लॅटफॉर्मवरच आपटते. नंतर ती पुरुषाला मारहाण करण्यास सुरुवात करते. तर तो पुरुष देखील महिलेचे केस ओढतो.