सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामने आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर, मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकवर ट्रस्ट/ इंटिग्रिटी टीमचं (जाहिराती आणि व्यावसायिक उत्पादनांसाठी) नेतृत्व करणाऱ्या रॉब लीथर्न यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली.
रॉब लीथर्न यांनी 'आम्ही मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिराती आणि प्रोडक्ट लिस्टिंगवर बंदी घालत आहोत. कोविड-१९ वर आमची नजर आहे. या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा कोणी फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळल्यास, आम्ही आमच्या धोरणांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणार असल्याचं,' लीथर्न यांनी ट्विट केलं आहे.
एडम मोसेरी यांनी, 'पुरवठा कमी आहे आणि किंमती जास्त आहेत. आम्ही या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत असलेल्या लोकांच्या विरोधात आहोत. येत्या काही दिवसांत आम्हीदेखील याची सुरुवात करणार असल्याचं,' त्यांनी सांगितलं.