मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील बेरहमपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने एका मुलीच्या घरात घुसून तिची हत्या केली. त्या तरुणाने १७ वर्षांच्या मुलीवर चाकूने वार करून खून केला. मुलीची हत्या करणारा आरोपी तरुण तिचा प्रियकर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बेरहमपूरच्या गोपाळपूर पोलीस स्टेशन परिसरात घडली.
पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली खुन्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे. मुलीचे पालक घरी नसताना ही घटना घडली. आरोपीने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि वादानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. अशी माहिती समोर आली आहे.