ओडिशामधून रेल्वे अपघाताची बातमी येत आहे. येथे कामाख्या एक्सप्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. कटकमधील नेरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. आतापर्यंत सात प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. ही ट्रेन बेंगळुरूहून आसाममधील गुवाहाटी येथील कामाख्या स्टेशनला जात होती. या घटनेचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, रुळावरून घसरल्यामुळे तीन गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. या गाड्या धौली एक्सप्रेस, नीलाचल एक्सप्रेस आणि पुरुलिया एक्सप्रेस आहेत.
अपघातानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विट केले. त्यांनी मेसेजवर लिहिले की, 'ओडिशामधील कामाख्या एक्सप्रेसशी संबंधित घटनेची मला माहिती आहे. आसामचे मुख्यमंत्री ओडिशा सरकार आणि रेल्वेच्या संपर्कात आहेत. आम्ही प्रभावित झालेल्या प्रत्येकाशी संपर्क साधू.”