जातीय जनगणनेच्या निर्णयावर महाराष्ट्राच्या मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “मी नरेंद्र मोदी सरकारचे अनेक वेळा आभार आणि अभिनंदन करेन, कारण या निर्णयाची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. मला माझे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे एक भाषण आठवते, ज्यात त्यांनी म्हटले होते की जातीय जनगणनेमुळे समाजाचे खरे चित्र समोर येईल.
तसेच त्या म्हणाल्या की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पावरून केंद्र सरकारने घेतलेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. या देशातील अनेक नेत्यांना अनेक वर्षांपासून हे हवे होते.