95 वर्षीय आजोबांची जगण्यासाठी धडपड, लग्नात ताशा वाजवतात, व्हिडीओ वायरल

Webdunia
रविवार, 4 जून 2023 (11:00 IST)
कधी कधी स्वतःचे पोट भरण्यासाठी कोणाला काहीही करावे लागते. खायला काहीही नसेल आणि डोक्यावर छत नसेल तर माणसाला कोणत्याही थराला जाऊन पैसे कमवावे लागतात. मग वय काहीही असो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक 95 वर्षाचे आजोबा आपले पोट भरण्यासाठी लग्न समारंभात ताशा वाजवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात पाणी नक्कीच येणार. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by pandey Rutvik (@mr_pandeyji_198)

इंस्टाग्राम यूजर रुत्विक पांडे (@mr_pandeyji_198) वर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजोबा  गुजरातचा व्हायरल व्हिडिओ लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहेत. त्यांचे वय 95 वर्षे आहे. पोटापाण्यासाठी या वयात कष्ट करून पैसे कमावतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो कधी सर्वांसमोर ढोल वाजवतो तर कधी थकून जमिनीवर बसतो. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्याला 1.7 कोटी व्ह्यूज मिळाले, त्यानंतर लोक त्यांच्या मदतीसाठी पुढे आले.
 
 
Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

पुढील लेख