काँग्रेसने म्हटलं- मोदी जिंकले, भाजप नाही

गुरूवार, 23 मे 2019 (16:30 IST)
काँग्रेसने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला भाजपसाठी ‘इलेक्ट्रॉनिक विक्ट्री मशीन’ झाल्याचे परिणाम असल्याचे सांगितले आणि म्हटलं की ही जीत भाजपच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. 
 
काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की आतापर्यंतच्या निकालावरून अंदाज येत आहे की ही विजय पक्षाची नसून सरळ मोदींची आहे आणि याचे पूर्ण श्रेय केवळ मोदींचे आहे.
 
त्यांनी ईव्हीएम संदर्भात देखील भाजप आणि मोदी यांच्यावर टीका करत म्हटले की या निवडणुकीत मोदींचा विजय ‘आदर्श आचारसंहिता मोदी आचारसंहिता’ यात परिवर्तित झाल्याचे परिणाम आहे. त्यांनी प्रश्न केला की काय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी काही पाऊल उचलले जातील का ईव्हीएमला भाजपसाठी ‘इलेक्ट्रानिक विक्ट्री मशीन’ बनलेलं राहू दिले जाईल.
 
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेता उमर अब्दुल्ला यांनी देखील मोदींना शुभकामना देत ट्विट केले की 'तर एग्झिट पोल खरे सिद्ध झाले. भाजप आणि एनडीला शुभकामना. या परिणामाचे श्रेय पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना आहे, ज्यांनी अत्यंत व्यावसायिकपणे निवडणूक प्रचार केले आणि जीत सुनिश्चित केली.'

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती