युरोपियन दौऱ्यावर भारत अ पुरुष हॉकी संघाचा इंग्लंड कडून सलग दुसरा पराभव

बुधवार, 16 जुलै 2025 (08:13 IST)
मंगळवारी युरोपियन दौऱ्यात भारत अ पुरुष हॉकी संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाचा इंग्लंडकडून 3-2 असा पराभव झाला.
ALSO READ: किदाम्बी श्रीकांतचा कॅनडा ओपन बॅडमिंटनच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
मनिंदर सिंग आणि उत्तम सिंग यांनी एका कठीण सामन्यात भारत अ संघासाठी गोल केले. भारतीय प्रशिक्षक शिवेंद्र सिंग म्हणाले की, दौऱ्याच्या सुरुवातीला आम्हाला सलग तीन विजय मिळाले आणि संघाला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागत आहे. 
ALSO READ: बुद्धिबळपटू हरिकृष्णन ए रा भारताचे 87 वे ग्रँडमास्टर बनले
दौरा जसजसा पुढे जाईल तसतशी स्पर्धा कठीण होईल. भारतीय संघाला अजूनही दोन बलाढ्य संघांसह आणखी तीन सामने खेळायचे आहेत. गुरुवारी, संघअँटवर्पमध्ये बेल्जियमविरुद्ध खेळणार आहे, त्यानंतर संघ 18 आणि 20 जुलै रोजी एंडोव्हेनमध्ये नेदरलँड्सविरुद्ध खेळेल.
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: भारताला टॉप पाच क्रीडा देशांमध्ये स्थान देण्यासाठी खेलो इंडिया धोरणाला मंत्रिमंडळाची मान्यता

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती