माहिती मिळताच पोलिस आणि कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. दसऱ्याच्या दिवशी ही एक अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, अलिकडच्या काळात मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, कालवे, नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहे. अधिकाऱ्यांनी जनतेला वाहत्या पाण्याजवळ जाऊ नका किंवा खेळू नका असे आवाहन केले आहे.