WhatsApp : तुमच्याकडेही जुना फोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 24 ऑक्टोबर 2023 पासून अनेक स्मार्टफोन्सवर व्हाट्सअप सपोर्ट बंद होणार आहे, म्हणजेच या फोनवर व्हाट्सअप काम करणार नाही. व्हाट्सअपचा हा सपोर्ट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही उपकरणांसाठी संपत आहे. Android 4.1 आणि जुन्या आवृत्तीवर व्हाट्सअप काम करणार नाही. व्हाट्सअप पहिल्यांदाच असे करत आहे, असे नाही. व्हॉट्सअॅप दरवर्षी एक यादी प्रसिद्ध करते.
व्हाट्सअप सपोर्ट बंद करणे म्हणजे व्हाट्सअप पूर्णपणे बंद करणे असा होत नाही. व्हॉट्सअॅप तुमच्या जुन्या फोनवरही काम करेल, पण त्यात नवीन अपडेट्स मिळणार नाहीत आणि नवीन फीचर्सही मिळणार नाहीत. याशिवाय तुमच्या व्हाट्सअपची सुरक्षाही पूर्वीपेक्षा कमकुवत होईल आणि हॅकिंगचा धोका असेल.
तुमचा फोन या यादीत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या फोनवर व्हाट्सअप सपोर्ट बंद होणार नाही. व्हाट्सअप सपोर्ट बंद करणे तुमच्या फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमवर (OS) अवलंबून आहे. तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये About वर जाऊन, तुम्ही तुमच्या फोनच्या OS आवृत्तीबद्दल माहिती मिळवू शकता आणि तुमच्या फोनवर व्हाट्सअप सपोर्ट बंद होईल की नाही हे जाणून घेऊ शकता.