जगात ब्रॉडबँड वेगामध्ये भारत ६८ व्या स्थानावर

बुधवार, 29 मे 2019 (09:50 IST)
जगात फिक्स्ड ब्रॉडबँड वेगामध्ये भारत ६८ व्या स्थानावर आहे आणि मोबाइल वेगातील क्रमवारीमध्ये भारत १२१ वर घसरला आहे. स्पीडटेस्टच्या मागे असलेल्या ओकला या कंपनीने एप्रिल २०१९ साठी स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स अहवाल जाहीर केला आहे. 
 
२९.२५ एमबीपीएस सरासरी डाउनलोड गतीसह फिक्स्ड ब्रॉडबँडमध्ये भारताचे ६८ वे स्थान कायम असून, देशातील १०.७१ एमबीपीएस सरासरी डाउनलोड गतीसह मोबाइल वेगातील क्रमवारीमध्ये भारताची घसरण झाली आहे. २०१८ च्या सुरुवातीस ओकलाच्या अहवालानुसार, भारत जागतिक फिक्स्ड ब्रॉडबँड वेगासाठी ६७ व्या क्रमांकावर आणि मोबाईल इंटरनेट वेगासाठी १०९ व्या स्थानावर होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोबाइल इंटरनेट वेगामध्ये भारताचे कामगिरी खराब झाली आहे.
 
एप्रिल स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स ६५.४१ एमबीपीएसच्या सरासरी डाउनलोड गतीसह जगातील मोबाईल इंटरनेट वेगामध्ये नॉर्वे अग्रस्थानावर आहे. तर सिंगापूर १९७.५० एमबीपीएस सरासरी डाउनलोडसह फिक्स्ड ब्रॉडबँड इंटरनेट वेगामध्ये अग्रस्थानावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती