नेट बँकिंगसाठी नेहमी वेरिफाइड किंवा विश्वसनीय ब्राउझर वापरावे. आपण एखाद्या अनऑथेंटिक साईटहून एखादे अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड कराल तर फसवणुकीची शक्यता अजूनच वाढते. कारण यात बग किंवा व्हायस असू शकतं. सोबतच आपल्या मोबाइल किंवा लॅपटॉपमध्ये उत्तम अँटी-व्हायरस प्रॉटेक्शन सिस्टम असावे ज्याने आपल्याला अलर्ट मिळू शकेल.
आपल्या नेट बँकिंगचे पासवर्ड, ओटीपी, पिन, कार्ड वेरिफिकेशन कोड (CVV) आणि यूपीआई पिन कोणासोबतही शेअर करू नये. आपलं पासवर्ड विसरल्यास त्याची रिकव्हरी देखील काळजीपूर्वक करावी.