आधार नंबरवरून आपले बँक खाते हॅक होऊ शकतात का?

आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड हे अनेक महत्त्वाचे कागदपत्रे असतात. त्यांच्यातील माहिती देखील महत्त्वाची असते. आधार कार्डमध्ये भारतीय व्यक्तीची बायोमेट्रिक माहितीव्यतिरिक्त व्यक्तीच्या इतर वैयक्तिक माहिती देखील असतात.
 
आता प्रश्न उठतो की आधार नंबरची माहिती असल्याने कोणीही आपल्या बँक खाते हॅक करू शकतो का? 
तर या बाबतीत आधारच्या विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने सांगितले की असे शक्य नाही. यूआयडीएआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हे पूर्णपणे चुकीचे आहे. यूआयडीएआयचे म्हणणे आहे की
ज्या प्रकारे फक्त आपल्या एटिएम कार्डची माहिती माहीत असून कोणीही एटिएम मशीनमधून पैसे काढू शकत नाही, तसेच फक्त आपल्या आधार नंबरची माहिती ठेवण्याने कोणीही व्यक्ती आपल्या बँक खात्याला हॅक करू
शकत नाही आणि पैसे देखील काढू शकत नाही. 
 
आपण बँकेद्वारे दिलेला पिन / ओटीपी शेअर केला नाही तर आपले बँक खाते सुरक्षित आहे. आपल्याला देखील याची काळजी घ्यावी लागेल. आपला एटिएम पिन कुठेही शेअर करू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती