IPL च्या 17 व्या मोसमातील 59 वा लीग सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी सीएसकेसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे.
चेन्नई सुपर किंग्जसध्या 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत.प्लेऑफमध्ये सहज स्थान मिळवण्यासाठी त्याला उर्वरित तीन सामने जिंकावे लागणार. गुजरात आणि चेन्नई यांच्यात यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा हा सामना खेळला जाणार आहे, ज्यामध्ये सीएसकेने गेल्या सामन्यात 63 धावांनी मोठा विजय मिळवला होता.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खूप धावा केल्या जातात. हे मैदान मोठे आहे, पण फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही ते उपयुक्त आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएलच्या 17 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांना 6 सामने जिंकता आले आहेत, तर 5मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. CSK सध्या 12 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे,