नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरू संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 241 धावा केल्या. विराट कोहलीने 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 92 धावांची खेळी खेळली.रजत पाटीदारने 23 चेंडूत 55 आणि कॅमेरून ग्रीनने 27 चेंडूत 46 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 17 षटकांत 181 धावांवर गारद झाला.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बंगळुरू संघाची सुरुवात चांगली झाली नाही. विद्वत कावरप्पाने संघाला पहिले दोन धक्के दिले. त्याने प्रथम कर्णधार फाफ डुप्लेसिस (9) आणि नंतर विल जॅक (12) याला बाद केले. गारपिटीमुळे सामना काही काळ थांबला होता. रात्री 8.55 वाजता पुन्हा सामना सुरू झाला आणि त्यानंतर कोहलीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.तो 47 चेंडूंत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 92 धावा करून बाद झाला.पंजाबकडून हर्षल पटेलने तीन बळी घेतले.अर्शदीप आणि सॅमने प्रत्येकी एक विकेट घेतली. अशाप्रकारे बेंगळुरूने 20 षटकांत 7 गडी गमावून 241 धावा केल्या.
242 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात खराब झाली. प्रभसिमरन सिंग सहा धावा करून बाद झाला.रुसोने 21 चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला .