बुमराहला विश्वचषकापूर्वी विश्रांती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे कारण तो टी-२० विश्वचषक भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.या वर मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड म्हणाले की जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा संघाचा असा काहीही विचार नाही .
टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बुमराहला विश्रांती देण्याच्या प्रश्नावर पोलार्ड म्हणाला, आम्ही याबद्दल बोललो नाही. हे माझे काम आहे असे मला वाटत नाही पण बघूया काय होते ते. आम्ही सर्वजण संपूर्ण आयपीएल खेळण्यासाठी येथे आहोत. आयपीएल पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यानंतर काय होते ते पाहू.
मुंबई इंडियन्स आता 17 मे रोजी घरच्या मैदानावर लखनौ सुपरजायंट्सशी भिडणार आहे. या आयपीएलमधील ग्रुप स्टेजमध्ये मुंबई संघाचा प्रवास संपुष्टात येऊ शकतो, अशा परिस्थितीत जर संघ व्यवस्थापनाने बुमराहला विश्रांती दिली तर तो अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी सुटकेचा नि:श्वास टाकू शकतो.