Mahirat धोनी आणि विराटच्या नावाने कोल्हापुरात चहाचे दुकान

Webdunia
मंगळवार, 18 एप्रिल 2023 (18:14 IST)
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली दोघेही भारताचे दोन माजी महान कर्णधार आणि फलंदाज यात शंका नाही. दोघांचेही जगभरात कोट्यवधी चाहते आहे. जेव्हा जेव्हा हे दोघे मैदानात उतरतात तेव्हा क्रिकेट फॅन्स त्यांच्या नावाचा गजर करत एकच धमाल करतात. अशाच प्रेमळ फॅन्सचं उदाहरण महाराष्ट्राच्या कोल्हापुरात बघायला मिळत आहे. येथे CSK कर्णधार आणि RCB मॅन या दोघांमुळे एका चहाच्या दुकानाला वेगळीच रौनक आली आहे. या टी स्टॉलचे नाव माहीराट (Mahirat) आहे.
 
महाराष्ट्रातील कोल्हापुरातील एका चहाच्या दुकानाचा फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या चहाच्या दुकानाचे नाव विराट कोहली आणि एमएस धोनीच्या नावावरून ‘माहीराट अमृततुल्य चहा’ ठेवण्यात आले आहे. दोघेही क्रिकेटपटू सुप्रसिद्ध आहेत आणि चाहते त्यांच्या आवडत्या जोडीला पाठिंबा दर्शवण्यासाठी काहीही करु शकतात. हे याचे उदाहरण आहे.
 
 
चहाच्या दुकानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि चाहते त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख