आकाशातून हिमालय कसा दिसत असेल? कदाचित हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल. परंतु आता नासाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. हिमालयाचे सौंदर्य जगभरात प्रसिद्ध आहे, पण आता याची भव्यता आकाशातून दिसत आहे, त्याची चर्चा सर्वत्र आहे. अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने हिमालयातील शिखराची एक आश्चर्यकारक झलक शेअर केली असून हिमालयातील पर्वत हिमवृष्टीने झाकलेले दिसत आहेत. हिमालयाचे हे चित्र नासाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, ज्यात भारताची राजधानी दिल्ली देखील रात्री चमकत आहे.