कोरोनापासून बचावासाठी नेकलेस कामास येईल असा दावा करण्यात येत आहे. याला पल्स असे नाव देण्यात आले आहे.जसे की सर्वांनाच ठाऊक आहे की हात धुणे, चेहरा, नाक, डोळ्यांना स्पर्श करणे टाळावे असा सल्ला डॉक्टर्स किंवा तज्ज्ञांद्वारे वारंवार दिला जात आहे. नासाने हेच लक्षात ठेवत खास नेकलेस तयार केले आहे. याची विशेषता म्हणजे आपण आपले हात जसेच चेहर्याजवळ घेऊन जाला हे वायब्रेट करू लागेल ज्याने आपल्याला चेहर्यावर हात लावणे टाळायचे आहे असे संकेत मिळतील.
हे आगळे-वेगळे नेकलेस नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबमध्ये तयार केले गेले आहे. याला थ्री-डी प्रिंटरच्या साहाय्याने तयार केले गेले आहे. खरं तर या हारमध्ये शिक्क्याचा आकाराचे डिव्हाईस आहे ज्यात इंफ्रारेड सेंसर लागलेले आहे. हे सेंसर 12 इंच पर्यंत जवळपास कोणतीही वस्तू आल्यास वायब्रेट करू लागतं. यात तीन वॉल्टची एक बॅटरी देखील लागलेली आहे.