Father's Day Quotes In Marathi

बुधवार, 17 जून 2020 (08:33 IST)
* बाप जिवंत असेपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाही

* आपले दु:ख मनात लपवून ठेवणारा देव माणूस म्हणजे वडील

* खिशा रिकामा असला तरी कधी नकार देत नाही, मी वडीलांपेक्षा श्रीमंत माणूस कधी बघितला नाही

* आपल्या शरीरातून काढून प्राण देतो, महान आहे जन्मदाता जो कन्यादान करतो

* वडील कडुलिंबाच्या झाडासारखे असतात...पानं कडु असली तरी सावली मात्र थंडावा देणारी असते.

* संपूर्ण जगात वडीलच एक असं व्यक्तिमत्तव असतं ज्याला आपले मुलं स्वत:पेक्षा अधिक यशस्वी व्हावे असं वाटतं.

* आकाशालाही लाजवील अशी उंची आणि आभाळाही लाजवेल असे कर्तृत्व असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाप.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती