तसेच टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू रिंकू सिंगला कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे मायदेशी परतावे लागले आहे. रिंकू सिंग झिम्बाब्वेविरुद्धच्या पुढील सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या जागी संजू सॅमसन किंवा दुसऱ्या खेळाडूची निवड होऊ शकते. टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा पुढील सामना २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यापूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
रिंकू सिंगला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी २४ फेब्रुवारी रोजी घरी परतावे लागले. तो चेन्नईमध्ये आजच्या सराव सत्रात सहभागी झाला नाही. यामुळे रिंकू आता झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही हे स्पष्ट झाले. तो संघात कधी परत येईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रिंकू सिंग या विश्वचषकात आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाचा भाग आहे, परंतु तेथील त्याची कामगिरी अपवादात्मक नव्हती.