चंद्रावर पाणी; नासाचा दावा

मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (11:17 IST)
चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा नासाने केला आहे. नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधले आहे, असेही नासाने म्हटले आहे. या पाण्याला साधन संपत्ती समजायचे का? हे अद्याप निश्चित समजू शकलेले नाही. मात्र चंद्रावर पाणी सापण्याचे महत्त्वाचे मानले जात आहे. नासाच्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन हे टि्वट काही वेळापूर्वीच्या करण्यात आले आहे.
 
अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती