कोरोना व्हायरसमुळे Bigg Boss मध्ये मोठा बदल

सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (14:07 IST)
बिग बॉस म्हणजे भांडण, वादावादी, गॉसिप्स, आणि धमाल मनोरंजनाने भरलेला बहुचर्चित अशा हा शो एका नव्या पर्वणीसह प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा सज्ज होण्याचा मार्गावर आहे. यंदा बिग बॉसच्या या चौदाव्या पर्वाला 'बिग बॉस 2020' हे शीर्षक देण्यात आले आहे. यंदाच्या या पर्वात काय नवे असणार, थीम कशी असणार या बाबत सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. 
 
एकाच घरात तीन ते चार महिने अनोळखी माणसांबरोबर राहण्याचा हा उपक्रम प्रेक्षकांना फार आवडला. आता बिग बॉसचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे.
 
पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शो मध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. यंदाच्या या पर्वामध्ये हा शो पूर्वीसारखा एका तासाचा नसून फक्त अर्धा तासाचा असणार असे समजत आहे. सध्या सामाजिक अंतर राखणे हे महत्त्वाचे असून या शो मध्ये सर्व एकत्र राहणार, त्यामुळे हे नियम पाळणे एका आहवानात्मक आहे. त्यामुळे या शो मध्ये नव्यानव्या गोष्टी प्रेक्षकांना दिसून येणार आहेत.
 
सध्या या शो ची जय्यत तयारी सुरू झाली आहे आणि सलमान खान देखील एका दमदार भूमिकेत दिसून येणार असून त्यांनी या शो च्या प्रोमोचं शूटिंग त्यांचा फार्म हाउस वर केलं होतं. बिग बॉस साठी केलेल्या प्रोमोचे शूट बघून प्रेक्षकांच्या अपेक्षा अजून उत्कंठेला लागल्या आहेत.
 
बिग बॉसच्या सूत्रसंचालनासाठी सलमान खान यांना तब्बल 250 रुपये कोटी मानधन देण्यात आल्याचं समजत आहे. त्यांनी आपले मानधन वाढविल्याचे समजत आहे. सलमान आठवड्यातून एकदाच दोन भागाचं चित्रीकरण करण्याचे बोलले जात आहे. 
 
या कार्यक्रमाचे प्रसारण सप्टेंबरच्या शेवटी सुरू करण्याचे होते पण या कार्यक्रमाला उशीर होण्याचे दिसून येत आहे. 
 
मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये बिग बॉसचं चित्रीकरण तयार केलेल्या एका घरात करण्यात येतं, पण सध्या सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे हे शक्य होतं नाही. त्यामुळे अडथळे येतं आहे. पाऊस थांबल्यावर घर बांधणीचे कामास पुन्हा वेग येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती