घरात लग्न असले की वेगळीच लगबग सुरु असते. या साठी पूर्व तयारी करावी लागते. लग्न म्हटले की सर्वात आधी येते ती मुला मुलीच्या पत्रिकाची जुळवणी. नंतर मुला मुलीची पसंतापसंती. नंतर सर्व गोष्ठी मनाप्रमाणे झाल्या की ठरतो साखरपुड़ा किंवा साक्षगंध. साखरपुड़ा करून लग्न पक्के केले जाते.
या विधिसाठी वर मंडली वरासह कन्येच्या घरी जातात आणि वरासाठी कन्येची मागणी करतात किवा वधु पक्ष वर पक्षाकडे जाऊन वराची मागणी घालतात.नंतर दोन्ही पक्षांकडून होकार आल्यावर लग्न ठरल्याचे जाहिर केले जाते. साखरपुड़ा हा लग्नापूर्वीचा महत्त्वाचा विधि आहे. विवाहित स्त्रिया भावी वर वधूचे औक्षण करतात. वराची आई मुलीची ओटी भरतात मुलीला साडी, चोळी, बांगड्या, कुंकु अणि नारळ, फळे, खडीसाखरेचा पुडा देतात.
तसेच मुलीच्या घरचे मंडली मुलाला कपडे, नारळ देतात. दोन्ही पक्षांकडून मुलासाठी व मुलीसाठी अंगठ्या ठेवतात. मुलगा व मुलगी सर्व वडीलधाऱ्यांच्याआशीर्वाद घेऊन एकमेकांना अंगठ्या घालतात.अशा प्रकार साखरपुड़ाविधि पूर्ण होतो.