Engagement Wishes In Marathi साखरपुड्याच्या शुभेच्छा
सोमवार, 20 जानेवारी 2025 (13:25 IST)
लक्ष्मी नारायणा सारख्या सुंदर जोडीला
साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा..
प्रेम, सुख, आनंद तुमच्या आयुष्यात असेच कायम राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना
साखरपुड्या निमित्त तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण व्हावी
हीच मनापासून इच्छा
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा..
उन्हात सावली प्रमाणे
अंधारात उजेडा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..
साखरपुड्या निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
भविष्यातील नवरदेव आणि नवरीला
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
परमेश्वर कृपेने तुमचे प्रेम नेहमी वाढत राहो..
जन्मो जन्मांची साथ देणारा साथी तुम्हाला मिळाला,
याचा मला खूप आनंद झाला
तुमच्या दोघांच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
साखरपुड्याच्या शुभेच्छा
तुमच्यासारख्या प्रेमळ जोड्या परमेश्वर स्वर्गात बनवतो
तुमच्या दोघांचे येणारे आयुष्य सुख समाधानाने भरलेले असो
तुम्हाला साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
ईश्वराने तुमच्या दोघांना एकमेकांसाठीच बनवले आहे
तुमची मने जुळली याचा मला खूप आनंद आहे
तुमच्या दोघांच्या आनंददायी आयुष्यसाठी प्रार्थना
तुमच्या दोघांना साखरपुड्याच्या शुभेच्छा
साखरपुड्याची ही अंगठी एक
तुमच्या आयुष्यात आणेल आनंद अनेक
तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या दोघांच्या प्रेमाला आज नवे रूप मिळाले
तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
आपण फार नशीबवान आहात
कारण या विश्वातील करोडो लोकांमधून
आपण एकमेकांना शोधून काढले
आपली जोडी ईश्वराने एकमेकांसाठीच बनवली आहे
तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
झाली आज माझ्या लाडक्या ताईची सगाई
ताई आणि जिजुंना नव्या आयुष्याची बधाई
साखरपुड्याच्या अनंत शुभेच्छा
खर सूर्यप्रकाशात छायेप्रमाणे
गडद अंधारात लक्ख प्रकाशाप्रमाणे
प्रत्येक प्रसंगात एकमेकांची अशीच साथ देत रहा
तुम्हा दोघांना साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा