राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे जाणून घेऊया…

गुरूवार, 16 एप्रिल 2020 (08:24 IST)
देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात जारी असलेले लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत वाढविले. तथापि, कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट आढळून आल्यास देशातील काही भागात 20 एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिली जाऊ शकते. लॉकडाऊनचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे सामाजिक दुराव आणि एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या हालचाली रोखून कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने राज्य सरकारांनी ई-पास प्रणाली लागू केली आहे. हा ई-पास वापरून लोक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतात. ई-पासच्या साहाय्याने आरोग्य, वैद्यकीय, वीज, पाणी यासारख्या आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊ शकतो. आपण आपल्या राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे जाणून घेऊया…

अशा प्रकारे करा ऑनलाईन अर्ज
आपल्या राज्य, केंद्रशासित प्रदेश किंवा शहराच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘अप्लाई ई-पास’ वर क्लिक करावे. ई-पास फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व आवश्यक माहिती भरावी आणि कोणत्याही दस्तऐवजाची प्रत मागितली असल्यास ती अपलोड करुन अर्ज सबमिट करावा. एकदा आपला पास मंजूर झाल्यावर आपणास अधिकाऱ्यांकडून संदेश मिळेल, त्यानंतर ई-पास प्रतीचे प्रिंट आउट घेऊन आपण बाहेर जाऊ.
महाराष्ट्र : https://covid19.mhpolice.in
मध्यप्रदेश : https://mapit.gov.in/covid-19/
मेघालय : https://megedistrict.gov.in/login.do?
मणिपुर : https://tengbang.in/StrandedForm.aspx
पंजाब : https://epasscovid19.pais.net.in
पुडुचेरी : https://covid19.py.gov.in
 
कर्फ्यू ई-पाससाठी आवश्यक असलेल्या सेवांची यादी
– आरोग्य सेवा
– अग्निशमन विभाग
– अन्न पुरवठा
– आरोग्य कर्मचारी
– बँक
– कायदा व सुव्यवस्था सेवा
– मीडिया
– मृत्यू प्रकरण
– वाहने (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रक, कार आणि बाइक)
– वीज
– पोलिस
– पाणी
– रुग्ण
 
ई-पास अर्जासाठी आवश्यक माहिती
– अर्जदाराचे नाव
– शहर
– जिल्हा
– अधिकृत आयडी
– फोन नंबर
– वाहन नोंदणी क्रमांक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती