Northern Nigeria News: उत्तर नायजेरियातील नायजर नदीच्या काठावर शुक्रवारी एका बाजारात अन्न घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान 27 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 100 हून अधिक बेपत्ता आहे. त्यात बहुतांश महिला होत्या. सुमारे 200 प्रवासी या बोटीवर होते, जी कोगी राज्यातून शेजारच्या नायजरला जात होती, तेव्हा बोट उलटली, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळपर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी नदीतून 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले, तर स्थानिक गोताखोर अजूनही इतरांचा शोध घेत आहे. तसेच घटनेनंतर सुमारे 12 तासांपर्यंत जिवंत व्यक्ती सापडली नाही.
तसेच कोणत्या कारणामुळे बोट बुडाली याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केलेली नाही परंतु स्थानिक माध्यमांनी सुचवले की बोट ओव्हरलोड झाली असावी. नायजेरियाच्या दुर्गम भागांमध्ये बोटींवर गर्दी सामान्य आहे, जेथे चांगले रस्ते नसल्यामुळे अनेक लोकांकडे पर्यायी मार्ग नाहीत. आफ्रिकेतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नायजेरियामध्ये अशा प्रकारच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. अधिकारी जलवाहतुकीसाठी सुरक्षा उपाय आणि नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी संघर्ष करत आहे.