महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या २९१६, आत्तापर्यंत २९५ रुग्णांना डिस्चार्ज

बुधवार, 15 एप्रिल 2020 (22:33 IST)
देशात आणि महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळवारी आणखी ३५० करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या २६८४ झाली आहे. यापैकी १९०० वर रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले.
 
दिवसभरात करोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत २५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जे १८ मृत्यू झाले त्यातले ११ मृत्यू मुंबईत झाले आहेत. आज ३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत एकूण २९५ जण हे बरे होऊन घरी गेले आहेत. करोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
करोनामुळे पुण्यातील परिस्थिती अधिकच बिघडत आहे. आज दिवसभरात पुण्यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याबरोबरच पुण्यातील मृतांचा आकडा आता 44 वर पोहचला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती