राज्यात शुक्रवारी १७ हजार ३२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १२ लाख २९ हजार ३३९ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर दिवसभरात १२ हजार १३४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ३०२ मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६४ टक्के इतका आहे. आतावर पाठवण्यात आलेल्या ७४ लाख ८७ हजार ३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ६ हजार १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ३६ हजार ४९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
सध्या राज्यात २३ लाख ५८८ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २४ हजार ९७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्या राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १२ हजार १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १५ लाख ६ हजार १८ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात १२ लाख २९ हजार ३३९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८१.६३ इतका झाला आहे.