कोरोना अपडेट, राज्यात १३,३९५ नवे कोरोनाबाधित दाखल

शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (08:27 IST)
कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या महाराष्ट्रात गुरुवारी १३,३९५ नवे कोरोनाबाधित आढळले. कोरोनामुळं या एका दिवसात ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, तब्बल १५,५७५ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. राज्यात एका दिवसातील कोरोना रुग्णांची ही आकडेवारी पाहता एकूण रुग्णांचा आकडा १४,९३,८८४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९,४३० मृत्यू आहेत, तर ११,९६,४४१ रुग्णांनी कोरोनारवर मात केली आहे. 
 
सध्याच्या घडीला राज्यात २,४१,९८६ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरु आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राज्यात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं भर पडत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट ८१.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती