मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, वीज पडणे आणि झाड पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात अनेक भागात पाणी साचले आहे, त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान खात्याने दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.