Ayushman Vaya Vandana Yojana: आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत, प्रत्येक नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकाला आरोग्य कार्ड दिले जाईल. तसेच दिल्ली सरकारने सोमवारी आयुष्मान वय वंदना योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, दिल्लीत राहणाऱ्या ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतील.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राजधानीत एका कार्यक्रमात लाभार्थ्यांना पहिले आयुष्मान वय वंदना कार्ड वाटप केले. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार (प्रधानमंत्री जन आरोग्य योजना) आणि दिल्ली सरकार दोघेही दरवर्षी प्रत्येकी ५ लाख रुपयांचा वैद्यकीय खर्च उचलतील. ज्यामुळे एका व्यक्तीला वर्षाला एकूण १० लाख रुपयांचे वैद्यकीय कव्हर मिळेल.
आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत, प्रत्येक नोंदणीकृत ज्येष्ठ नागरिकाला आरोग्य कार्ड दिले जाईल. त्यांचे संपूर्ण आरोग्य रेकॉर्ड, नियमित आरोग्य तपासणी माहिती आणि आपत्कालीन सेवा तपशील या कार्डमध्ये सुरक्षितपणे संग्रहित केले जातील. या योजनेअंतर्गत, दिल्लीतील ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी सर्व वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जातील. अशी माहिती समोर आली आहे.
आरोग्य कार्डसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील
आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत नोंदणीसाठी आधार कार्ड, आधारशी जोडलेला सक्रिय मोबाइल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिल्लीचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, आरोग्य कार्ड बनवले जातील आणि लाभार्थ्यांना दिले जातील.