भारतातील पहिली "हायब्रिड" टॅक्सी सेवा- आता प्रवासी आणि चालक दोघांनाही मिळणार सन्मान आणि स्वातंत्र्य
शून्य कमिशन, प्रामाणिक भाडे आणि महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
पुणे: भारतातली प्रवास सेवा क्षेत्रात मोठी क्रांती घडवत, सीईओ कॅब्स ने आपल्या हायब्रिड कॅब सेवेला सुरुवात केली आहे. ही सेवा ऑनलाइन अॅप आणि ऑफलाइन रस्त्यावरून थांबवता येणारी अशा दोन्ही प्रकारांनी काम करते, जे भारतीय प्रवाशांच्या सवयींना अनुरूप आहे. हात दाखवा कॅब थांबवा या अनोख्या उपक्रमाचा पुण्यात प्रारंभ झाला असल्याची माहिती बाहुबली दुर्गेश तिवारी (संस्थापक,सीईओ,सीईओ कॅब्स ) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला कपिल भानुशाली (अध्यक्ष,सीईओ कॅब्स ),रौनक पटेल (कार्यकारी संचालक,सीईओ कॅब्स), वर्षा शिंदे-पाटील (अध्यक्ष,मॉ साहेब कॅब संघटना ), स्वप्निल राऊत (विशेष अधिकारी ,स्टॅटर्जी अँड प्लानिंग) आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना तिवारी म्हणाले, “ही फक्त एक अॅप आधारित सेवा नाही, तर भारतीय प्रवास संस्कृतीत नवा अध्याय आहे, आपल्या रस्त्यांनुसार आणि गरजांनुसार बनवलेली, ही एक प्रामाणिक आणि स्थानिक सेवा आहे. इतर कॅब सेवांप्रमाणे चालकांकडून मोठा कमिशन न घेता, सीईओ कॅब्स चालकांकडून शून्य कमिशन धोरण राबावते, यामुळे सर्व कमाई थेट प्रवाशांकडून चालकांना मिळते, रोख किंवा डिजिटल पद्धतीने ते रक्कम स्वीकारू शकतात, तसेच चालकांना कोणतेही लक्ष्य नाहीत, आणि ते स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकतात. सीओई कॅब ही आरटीओ ने ठरवून दिलेल्या मीटर दराने चालणारी एकमेव टॅक्सी सेवा असल्याचे तिवारी यांनी नमूद केले. तसेच स्थानिक रिक्षा चालकांना स्थानिक भाड्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे मिळावेत असाही आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
कपिल भानुशाली म्हणाले, प्रवाशांसाठी सीईओ कॅब्सने “हात दाखवा, कॅब थांबवा” ही संकल्पना भारतीय रस्त्यांवर पुन्हा आणली आहे. सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादानुसार, चालक आणि प्रवासी दोघेही या नव्या मॉडेलला उत्तम प्रतिसाद देत आहेत. भारतीय सवयींशी सुसंगत आणि पूर्णपणे पारदर्शक व प्रामाणिक सेवा देणारी ही भारतातील खऱ्या अर्थाने प्रवाश्यांसाठी "आपली" कॅब सेवा बनू शकते.
स्वप्निल राऊत म्हणाले, सीईओ कॅब्स मध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. कॅब बुक करताना व्यक्तिगत मोबाइल नंबर शेअर करण्याची गरज नाही, त्याऐवजी वडील, भाऊ किंवा मैत्रिणीचा नंबर वापरूनही बुकिंग करता येते. डेटा प्रोटेक्शन धोरणामुळे प्रवाशांची माहिती कोणत्याही परिस्थितीत शेअर केली जात नाही, त्यामुळे सुरक्षितता आणि मानसिक शांतता यांची हमी मिळणार आहे.
रौनक पटेल म्हणाले, सीईओ कॅब्स ही केवळ एक सेवा नसून एक चळवळ आहे. प्रामाणिक भाडे, सुरक्षित प्रवास आणि चालकांचं आर्थिक स्वातंत्र्य यांचा संगम. ही सेवा सध्या पुण्यासाह मुंबईत सुरू असून लवकरच नाशिक, छत्रपती संभाजीनगर शहरांमध्येही विस्तार होणार असल्याचे भानुशाली यांनी सांगितले.
वर्षा शिंदे-पाटील म्हणाल्या,मॉ साहेब कॅब संघटनाही चालकांचे हित जपण्यासा प्राधान्य देते. सीईओ कॅब्स ही चालकांचे हित जपणारी कंपनी आहे, ही इतर कंपन्या प्रमाणे अग्रिगेटर परवान्यावर भर देण्यापेक्षा राज्यातील स्थानिक आरटीओ धोरणाला प्राधान्य देते यामुळे चालकांचे आणि प्रवाश्यांचे हित जपले जाते, यामुळे आम्ही सीईओ कॅब्स सोबत उभे आहोत.