पुण्यात उंच इमारतीच्या बाल्कनीतून फुलदाणी पडल्याने एका मुलाचा मृत्यू
मंगळवार, 29 एप्रिल 2025 (11:05 IST)
घराच्या बाल्कनीत काही जड वस्तू फुलदाणी ठेवताना काळजी घेणे गरजेचे आहे. जेणे करून त्यामुळे कोणाला कधीही दुखापत होऊ नये. माणसाचा निष्काळजीपणा एखाद्याचा बळी घेऊ शकतो.
महाराष्ट्रातील पुणे येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे, जिथे एका उंच इमारतीच्या बाल्कनीतून फुलदाणी पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाला. घटनेनंतर लगेचच स्थानिक लोकांनी मुलाला रुग्णालयात नेले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
मयत मुलगा सोसायटीच्या आवारात आपल्या मित्रांसह क्रिकेट खेळत असताना त्याच्यावर फुलदाणी पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर सोसायटीत गोंधळ उडाला काही लोक तातडीने मदतीला आले आणि त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलाच्या कुटुंबाची अवस्था वाईट झाली आहे. घटनेपासून ते धक्क्यातच आहे. त्यांनी मुलाचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला. या घटनेमुळे सोसायटीत शोककळा पसरली आहे.