टोमॅटो-प्याजा स्पेशल

साहित्य : 2 मोठे टोमॅटो, 1 बारीक कापलेला कांदा, 200 ग्रॅम दही, 2 चमचे दाण्याचा कूट, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, कोथिंबीर बारीक चिरलेला, मीठ चवीप्रमाणे, 1/2 चमचा साखर, फोडणीसाठी मोहरी व तेल. 
 
कृती : टोमॅटो, कांदा, दही, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या व मीठ-साखर सर्व एका भांड्यात एकत्र कालवून घ्यावे. जेवण्या अगोदर त्यावर फोडणी घालावी व वरून कोथिंबीर टाकावी. ही कोशिंबीर फारच रुचकर लागते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती