करवंदाचे लोणचं

साहित्य : 100 ग्रॅम करवंद, 50 ग्रॅम हिरवी मिरची, 1/4 चमचा जिरं, 1 लहान चमचा शोप पावडर, 1 लहान चमचा धने पूड, 1/4 चमचा हळद, 1 मोठा चमचा तेल.

कृती : करवंद व हिरव्या मिरच्यांना लांब लांब कापून घ्यावे. तेल गरम करून त्यात जिरं, शोप, हळद आणि धने पूड घालून त्यात करवंद व मिरच्या घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यावे. हे लोणचे 10-15 दिवस खराब होत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती