चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळविण्यासाठी करिअर टिप्स

सोमवार, 31 मे 2021 (17:32 IST)
कोरोना कालावधीने लोकांच्या जीवनशैलीतही मोठा बदल केला आहे. आता काम करण्याची पद्धत देखील बदलली आहे.बर्‍याच कंपन्यांनी वर्षभर आणि कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम संस्कृती अवलंबविली आहे. या काळात बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत.चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळावा अशी सगळ्यांची इच्छा असते. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत त्या आपल्या कामी येऊ शकतात.चला तर मग जाणून घ्या.
 
1 आपल्याला काय पाहिजे त्याची निवड करा-काहीही सुरु करण्यापूर्वी आपल्याला काय पाहिजे हे माहित असावे.आपल्याला कोणत्या स्वरूपाची नोकरी पाहिजे.आपल्याला कोणत्याप्रकाराचे कार्य करावयाचे आहे.हे माहित असावे.आपण त्याकामासाठी इच्छुक असल्यास एक यादी बनवा की कोणत्या प्रकारचे काम केल्याने आपल्याला आनंद मिळतो. पगाराची काय अपेक्षा आहे. त्यानंतरच आपण एखाद्या कंपनीला रिज्युमे पाठवा.
 
2 रिज्युम नेहमी अपडेट ठेवा-रिज्युमे नेहमी अपडेट ठेवा त्यात आपण काय लिहिले आहे हे लक्षात ठेवा.जे काम करणार आहात त्याबद्धल ची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमाने शोधा. उदाहरणार्थ जर आपल्याला एखाद्या फायनान्स कंपनी मध्ये काम करायचे आहे तर,किंवा फायनान्स कंपनी मध्ये प्रोग्रॅम मॅनेजर म्हणून काम करत आहात तर त्याच्या संबंधित सर्व माहिती मिळवा. की कसं काम केले जाते आणि कामाचे स्वरूप कसे आहे.अशा पद्धतीने आपण आपला रिज्युम बनवू शकता.आणि निगडित कंपन्यांना पाठवू शकता.
 
3 शिक्षण आणि प्रशिक्षण प्रकार समजून घ्या- असं म्हणतात की शिकणे आणि वाचणे कधीही सोडू नका. या दोन्ही गोष्टी आपल्याला उत्कृष्ट बनवतात.म्हणून आपण ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या कामाला शिकून घ्या. त्याबद्दल माहिती मिळवा.त्यावर संशोधन सुरूच ठेवा.सध्या कोरोनाच्या काळात काही कंपन्या कामाचे मोफत प्रशिक्षण देत आहे.आपण त्याच्या माध्यमाने शिकू शकता.
 
4 नेटवर्क-आपले नेटवर्क वाढवा,जे आपल्याला एखादे चांगले काम शोधण्यास मदत करेल.या साठी सोशल मीडियाची मदत घेतली जाऊ शकते.आपल्या क्षेत्रातील लोकांशी जुडलेले राहा.त्याची वेळोवेळी मदत घेत राहा.अशा लोकांशी बोला जे आपला आत्मविश्वास वाढवतील.   
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती