योगा करण्यापूर्वी काय खावे आणि काय नाही जाणून घ्या

रविवार, 30 मे 2021 (16:58 IST)
आज योगा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. योगा हा शारीरिक व्यायाम नसून मानसिक व्यायाम देखील आहे. हे संपूर्ण जगात केले जाते.पूर्वीच्या काळी देखील लोक योगा करत असायचे. व्यापक स्तरावर योगा मोठ्या प्रमाणात केला जातो. याचे सर्व श्रेय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे.त्यांनी 21 जून हा दिवस योगा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरु केला.योगा करणे खूप चांगले आहे. त्यामुळे आपण निरोगी राहण्यासह आपले सर्व आजार नाहीसे होतात. शरीरात कुठेही वेदना होत असेल ती देखील योगा केल्याने दूर होते. योग करण्याचे देखील काही नियम आहे.योगा करण्यापूर्वी काय खावे आणि काय नाही हे जाणून घ्या.
 
* सकाळी सकाळी योगा करणारे योगा करण्याच्या 45 मिनिटा पूर्वी फळे खाऊ शकतात.या शिवाय प्रथिनेयुक्त आहार करून देखील दिवसाची सुरुवात करू शकतो.आपण आहारात ओट्स,प्रोटीन शेक आणि दही देखील खाऊ शकता.जे संध्याकाळी योगा करतात ते योगा करण्याच्या एक घंटा पूर्वी स्नॅक्स मध्ये उकडलेल्या भाज्या,सॅलड घेऊ शकतात.
 
* योगा केल्यावर काय काय खावं-
योगा केल्यावर किमान 30 मिनिटा नंतर पाणी प्यावं.या मुळे आपल्याला योगा करताना खर्च झालेले इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा मिळतात. इलेक्ट्रोलाइट्स हे आवश्यक असतात.याच्या कमतरतेमुळे शरीरात वेदना होऊ शकते.योगा केल्यावर पोषक घटकांनी समृद्ध जेवण करावं.हंगामी फळे,सॅलड आपण आहारात समाविष्ट करू शकता.उकडलेले अंडी,दही,शेंगदाणे,यांचा समावेश देखील आहारात असावा.
 
* योगा करण्याच्या पूर्वी किंवा नंतर चुकून देखील हे खाऊ नका-
योगा करण्यापूर्वी गरिष्ठ जेवण करू नका,तेलकट,तुपकट,आणि मसालेयुक्त जेवण करणे टाळा. असं केल्याने पचन शक्ती कमकुवत होते आणि योगा केल्याचा काहीच फायदा होत नाही.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती