बदाम खाण्याचे फायदेच नाही तर तोटे देखील आहे जाणून घ्या

रविवार, 30 मे 2021 (13:04 IST)
बहुतेक लोक भिजत घातलेल्या बदामाचे सेवन करतात.बदामाचं सेवन भिजवूनच का केले जाते.कोरडे बदाम का खात नाही जाणून घ्या. 
 
खरं तर बदाम सोलून खाणे तितके फायदेशीर नाही.जेवढे बिना सालीचे खाणे फायदेशीर आहे.याचे मुख्य कारण म्हणजे की साल हे पोषणमध्ये अडथळा निर्माण करतात.बदामात टॅनिन नावाचे घटक आहे.जे पौष्टिक घटकांच्या शोषणास प्रतिबंधित करतो. 
जर आपण कोरडे बदाम खाता तर त्यावरील साल काढणे शक्य नसते.पाण्यात भिजविल्याने साल काढणे सहज होते.अशा परिस्थितीत बदामाचे पोषण आपल्याला पूर्णपणे  मिळत नाही.म्हणून बदाम नेहमी भिजत टाकलेले खावे. 
 
याचे 5 फायदे जाणून घेऊ या.-
1 भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचन क्रिया देखील संतुलित होते.
 
2 हे अँटी-ऑक्सिडेंटने समृद्ध असतात, जे सरत्या वयावर  नियंत्रण ठेवतात.
 
3 बदामाच्या सेवनाने रक्तात अल्फाल टोकोफेरॉलचे प्रमाण वाढते,जे रक्तदाब नियंत्रित करतात.
 
4 भिजलेले बदाम खाल्ल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढत आणि बॅड  कोलेस्ट्रॉल कमी होत.
 
5 या मध्ये फॉलिक एसिड मुबलक असत.जे गर्भावस्थेत बाळाच्या मेंदूच्या आणि न्यूरॉलॉजिकल सिस्टमच्या वाढीस मदत करतो.
 
कोणी बदाम खाऊ नये. 
 
वरील लेखात हे माहित आहे की बदाम खाण्याचे बरेच फायदे आहेत. हे खरे आहे पण सर्व लोकांसाठी हे खाणे योग्य नाही.असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी बदामाचे सेवन करणे त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. चला, अशा लोकांबद्दल जाणून घ्या ज्यांनी बदाम खाणे टाळावे -
 
1 उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी बदामाचे सेवन करणे टाळावे कारण या लोकांना नियमितपणे रक्तदाबाची औषधे घ्यावी लागतात. या औषधांसह बदाम खाल्ल्याने आपल्या आरोग्यास हानी होऊ शकते.
 
2 ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा गॉल ब्लेडर चा त्रास आहे त्यांनी देखील बदाम खाऊ नये.
 
3  जर कोणाला पाचन समस्या उद्भवत असतील तर त्यांनी बदाम खाणे देखील टाळावे कारण बदामात भरपूर फायबर असते ज्यामुळे आपले त्रास आणखी वाढू शकतात.
 
4 जर एखादी व्यक्ती अँटीबायोटिक औषध घेत असेल तर त्याने बदाम खाणे देखील थांबवावे. बदामांमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असतात, ज्यामुळे शरीरावर औषधांचे होणारे परिणाम प्रभावित होऊ शकतात. 
 
5 जे लोक लठ्ठपणामुळे त्रस्त आहेत, त्यांनी बदामही खाऊ नयेत, कारण त्यात भरपूर कॅलरी आणि चरबी असते, जे वजन वाढवण्याचे काम करते.
 
6 ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी देखील बदामाचे सेवन करू नये.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती