रेल्वेच्या रुळामध्ये जागा रिकामी का असते?

रविवार, 30 मे 2021 (09:30 IST)
भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे.दररोज लाखो प्रवासी रेल्वेने  प्रवास करतात. रेल्वेच्या वाहतुकीसाठी एक निश्चित मार्ग तयार केला जातो, याला रूळ म्हणतात, ज्यासाठी लोखंड वापरुन लांब पल्ल्यात रेल्वे लाईन टाकली जाते. लांबच्या पल्य्याच्या रेल्वे लाईन टाकण्यासाठी रुळांचे मोठे सेक्शन आपसात जोडले जातात. जर आपण या जोडांना लक्ष देऊन बघितले  तर त्यामध्ये थोडी जागा शिल्लक राहते ती अजिबात एकत्र मिसळून  लावल्या जात नाहीत असं का ते जाणून घ्या?
रूळ लोखंडापासून बनलेल्या असतात आणि लोखंड  उन्हाळ्याच्या हंगामात उष्णतेमुळे पसरत आणि हिवाळ्यातील थंडीपासून संकुचित होतं जर हे रूळ आपसात एकत्रपणे जोडले तर  उन्हाळ्याच्या हंगामात लोखंड पसरल्यामुळे रूळ तुटण्याची किंवा दुमडून जाण्याची दाट शक्यता असते.आणि अपघात होऊ शकतो. म्हणून रुळाच्या मध्ये जागा सोडली जाते.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती