रेलवे रिक्रूटमेंट सेलने 3 हजारापेक्षा अधिक जागा रिकाम्या असल्याचे जाहीर केलं आहे. या जागा भरण्यासाठी विविध विभागात अपरेंटिस स्लॉट भरले जातील. रिक्त पदांची एकूण संख्या 3,591 आहे. या नोकर्यांसाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार आरआरसी च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करु शकतात.
25 मे पासून सुरु होईल अर्ज प्रक्रिया
या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 मे पासून सुरु होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून आहे. या रिक्त जागांसाठी 15 ते 24 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कापासून सूट देण्यात आली आहे. सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.