आयटीआय करून सुद्धा आपण बेरोजगार आहात किंवा आपल्या कंपनी किंवा नोकरीला बदलून सरकारी नोकरी मिळवू इच्छिता तर आयटीआय ते सिव्हिल,मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मधील डिप्लोमा धारकांना ही उत्तम संधी आहे. ही संधी पंजाब येथे मिळणार आहे. येथे 547 पदांवर आयटीआय डिप्लोमा धारकांसाठी भरती केली जात आहे.
पंजाब अधीनस्थ सेवा निवड मंडळ म्हणजे पंजाब सबॉर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने (पीएसएसएसबी) ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आयटीआय ते सिव्हिल, मॅकेनिकल आणि आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा धारक ते ज्युनिअर ड्राफ्ट्समन च्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार 11 फेब्रुवारी 2021किंवा या पूर्वी या sssb.punjab.gov.in संकेत स्थळावर या पदांसाठी अर्ज करू शकतात. नोंदणी फी जमा करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे.
पंजाब सब-ऑर्डिनेट सिलेक्शन बोर्ड द्वारे 547 रिक्त पदांच्या भरतीसाठी मोहीम राबविली जात आहे, या मध्ये 529 पदे सिव्हिलसाठी,13 पदे मॅकेनिकल साठी आणि 5 पद आर्किटेक्चर शाखेतून डिप्लोमा धारकांसाठी आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.