सरकारी नोकरी, या प्रकारे करा अर्ज

सोमवार, 25 जानेवारी 2021 (09:56 IST)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) जोधपुरने सीनियर रेजिडेंट पदांवर भरतीसाठी आवेदन काढले आहेत. या पदांसाठी 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज करता येईल. अधिकृत माहितीसाठी aiimsjodhpur.edu.in येथे विजिट करा.
 
या व्यतिरिक्त हरियाणा लोक सेवा आयोगमध्ये देखील सिव्हिल सेवा (न्यायिक शाखा) च्या ज्युनियर डिवीजनमध्ये देखील सिव्हिल जज पदांसाठी आवेदन आमंत्रित करण्यात आले आहे. ज्युनियर डिवीजनमध्ये सिव्हिल जज साठी 256 पदांवर योग्य उमेदवारांसाठी आवेदन आमंत्रित करण्यात आले आहे. या पदांवर निवड करण्यासाठी प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि साक्षात्कार घेतले जातील. या पदावर आवेदनासाठी उमेदवार हरियाणा लोक सेवा आयोगच्या अधिकृत वेबसाइट hpsc.gov.in वर लॉगइन करु शकतात.
 
नेशनल टेस्टिंग एजेंसी अर्थात NTA ने देखील स्टेनोग्राफर, सीनियर टेक्निशियन आणि ज्युनियर असिस्टेंट सह इतर पदांवर भरतीसाठी आवेदन आमंत्रित केले आहे. या पदांवर योग्य उमेदवार एनटीए च्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in वर विजिट करु शकता. आवेदन करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती