सरकारी नोकरी : आरबीआय भरती 2021 : सुरक्षा रक्षकांसाठी या राज्यात भरती सुरू अर्ज करा

शनिवार, 23 जानेवारी 2021 (16:48 IST)
RBI Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेले माजी सैनिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देण्याची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच ((RBI ने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर  rbi.org.in बँकेच्या विविध कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षक पदांसाठी अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र माजी सैनिक RBI च्या सुरक्षा रक्षकांच्या भरती साठी 22 जानेवारी 2021 रोजी पासून या संकेत rbi.org.in  स्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने बँकेच्या विविध कार्यालयांमध्ये सुरक्षा रक्षकाच्या  241  पदांसाठी पात्र आणि माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.पदांची निवड शारीरिक कार्यक्षमता चाचणी नंतर एक देशव्यापी स्पर्धात्मक परीक्षा(ऑनलाईन चाचणी ) द्वारे केली जाईल. भरती संबंधित तपशीलवार माहिती जसं की निवड प्रक्रिया , पात्रता, वयोमर्यादा, पगार इत्यादी दिली आहे.
 
आरक्षणानुसार रिक्तपदे     
 
सामान्य: एकूण 113 पदे 
ओबीसी: एकूण 45 पदे 
ईडब्ल्यूएस: एकूण 18 पदे 
एससी: एकूण 32 पदे 
एसटी: एकूण 33 पदे 
 
कोठे किती पद -
 
अहमदाबाद: एकूण 7 पद 
बेंगलुरू: एकूण 12 पदे  
भोपाळ: एकूण 10 पदे 
भुवनेश्वरः एकूण 08 पद 
चंदीगड : एकूण 02 पद 
चेन्नई: एकूण 22 पदे 
गुवाहाटी: एकूण 11 पद 
हैदराबाद: एकूण 03 पद 
जयपूर: एकूण 10 पद 
जम्मू: एकूण 04 पद 
कानपूर: एकूण 05 पद 
कोलकाता: एकूण 15 पदे 
लखनौ: एकूण 05 पद 
मुंबई: एकूण 84 पदे 
नागपूर: एकूण 12 पदे 
नवी दिल्ली: एकूण 17 पदे 
पटना: एकूण 11 पदे 
तिरुवनंतपुरम: एकूण  03 पदे 
 
शिक्षण आणि पात्रता - 
उमेदवार हा माजी सैनिक असावा. उमेदवाराने मान्यता प्राप्त राज्य शिक्षण मंडळ किंवा समकक्षा कडून दहावी उत्तीर्ण असावे.  
सैन्य सेवा सोडण्याच्या पूर्वी किंवा नंतर भरती क्षेत्राच्या बाहेरून पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणारे माजी सैनिक देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
 
महत्त्वाच्या तारखा -
 
ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख - 22 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख -12 फेब्रुवारी 2021 आहे
ऑनलाईन चाचणी फेब्रुवारी / मार्च 2021 (प्रस्तावित)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती