DRDO मध्ये अप्रेंटिसच्या पदांवर भरती, योग्यतेनुसार निवड
गुरूवार, 21 जानेवारी 2021 (16:50 IST)
डीआरडीओ भरती 2021:संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) अप्रेंटिसच्या वेगवेगळ्या पदांवर अर्ज मागविण्यात आले आहे. या साठी अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी,2021 पासून सुरू झाली आहे . या पदांसाठी ऑनलाईन अर्ज वैध असतील. नोकरीशी संबंधित संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील इत्यादी माहिती देण्यात येत आहे.
पदांचा तपशील -
एकूण पदांची संख्या - एकूण 150 पद
पदवीधर अप्रेन्टिस ट्रेनी - एकूण 80 पदे
डिप्लोमा अप्रेन्टिस ट्रेनी - एकूण 30 पदे
आयटीआय अप्रेन्टिस ट्रेनी - एकूण 40 पदे
महत्त्वाच्या तारखा -
अर्ज करण्याची प्रारंभिक तारीख -07 जानेवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जानेवारी 2021
वय मर्यादा-
या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय वर्ष 27 निश्चित केले गेले आहे.
शैक्षणिक पात्रता-
उमेदवाराकडे किमान शिक्षण म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. हे पदानुसार वेगवेगळे निश्चित केले आहे.
अर्ज प्रक्रिया-
या साठी डीआरडीओ च्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज करावे लागणार.
निवड प्रक्रिया-
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या किंवा योग्यतेच्या आधारे करण्यात येईल.
अर्ज फी -
उमेदवारांना कोणतेही प्रकाराचे अर्ज शुल्क आकारावे लागणार नाही.
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे https://rac.gov.in/index.php?lang=en&id=0 क्लिक करा.
अधिक सूचनेसाठी येथे https://rac.gov.in/download/advt_gtre_aprntc_26272021.pdf
क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी येथे https://rac.gov.in/index.php?lang=en&id=0