Central Railway Recruitment 2021 मध्य रेल्वेची महाराष्ट्रात मोठी भरती, दहावी उत्तीर्णांना संधी रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत 5 मार्च 2021 आहे. मध्ये रेल्वेच्या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. तसेच परळच्या वर्कशॉप आणि कल्याण डिझेल शेड आणि मनमाड वर्कशॉपमध्ये विविध जागांवर भरती करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये अडीच हजार जागांवर भरती निघाली आहे. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.