मुलतानी मातीचे फेसपॅक प्रत्येकासाठी नाही,5 तोटे जाणून घ्या

रविवार, 30 मे 2021 (14:54 IST)
जेव्हा त्वचेची काळजी घेण्याची गोष्ट येते मुलतानी मातीच्या फेस मास्काचा सल्ला दिला जातो.मुलतानी माती सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे, तसेच ती आपली त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यास देखील उपयुक्त आहे. पण त्याचेही बरेच तोटे आहेत. वास्तविक, मुलतानी माती नैसर्गिक मातीचा एक प्रकार आहे. ही औषधी गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे परंतु यामुळे आपल्या त्वचेला देखील काही नुकसान होऊ शकतं.
चला जाणून घेऊया मुलतानी मातीमुळे आपल्या त्वचेला काय नुकसान होऊ शकतं?
 
1 मुल्तानी मिट्टी हे संवेदनशील त्वचेसाठी फायदेशीर ठरण्यापेक्षा हानिकारक होऊ शकते.यामुळे त्वचेवर सौम्य पुरळ येऊ शकतात आणि त्वचा निर्जीव होऊ शकते.
 
2 कोरडी त्वचा असणाऱ्यांनी चुकून देखील याचा वापर करू नये.या मुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. डोळ्याच्या भोवती लावल्याने त्वचेला कोरडेपणामुळे देखील नुकसान होऊ शकत.
 
3 मुलतानी मातीची प्रकृती थंड आहे.जर आपल्याला सर्दी-खोकल्याचा त्रास आहे तर आपण मुलतानी माती वापरू नये.या मुळे सर्दी-खोकला जास्त वाढू शकतो.
 
4 आपण नियमितपणे मुलतानी माती वापरत असाल तर वापरणे थांबवा,याचा जास्त वापर केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.
 
5 मुलतानी मातीची सर्वात खास गोष्ट म्हणजे की ही तेलकट त्वचेसाठी खूप चांगली आहे.याचाअति प्रमाणात वापर केल्याने चेहऱ्यावर पुरळ देखील होऊ शकतात.काही गोष्टींची काळजी घेऊन आपण त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्यापासून वाचवू शकतो.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती